Badlapur Sex Racket : बदलापूरमध्ये वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश! हॉटेलवर धाड टाकून 1 दलाल महिला अटक, 2 पीडित मुलींची सुटका

Badlapur Sex Racket Busted News : अनौतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई; ‘हॉटेल आराधना’ परिसरातून महिला आरोपीला अटक
बदलापूर,ठाणे :– बदलापूर पश्चिम परिसरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अत्यंत धडक कारवाई करत वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या एका महिला दलालाला रंगेहात अटक केली आहे. Badlapur Sex Racket News हॉटेलवर सापळा रचून केलेल्या या कारवाईत दोन असहाय्य पीडित मुलींना माणुसकीच्या तस्करांच्या तावडीतून सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. Badlapur Latest Crime News
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना 18 नोव्हेंबर 2025 रोजी या रॅकेटची गुप्त माहिती मिळाली. स्टेशन रोड, बदलापूर पश्चिम येथील हॉटेल आराधना येथे एक दलाल महिला असहाय्य मुलींना फुस लावून वेश्यागमनासाठी बोलवणार असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने सापळा रचला.
पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून या दलाल महिलेला ताब्यात घेतले. तिच्या देखरेखीखाली असलेल्या दोन पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. आरोपी महिला दलालावर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.
पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मानवी तस्करीचा कट यशस्वीरीत्या उधळण्यात आला.


