क्राईम न्यूजमुंबई
Trending

Badlapur School Case : अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणे बदलापूरकर आक्रमक, पोलिसांवर दगडफेक

Badlpur School Case Latest News : विरोधकांकडून सरकारवर निशाणा गृहमंत्र्यांच्या राजीनामेची मागणी

बदलापूर :- बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी ज्या शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला Badlpur School Case होता, त्या शाळेती तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा झालेल्या आंदोलकांनी दगडफेक करत घोषणाबाजी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली.हे अतिशय गंभीर आणि संतापजनक आहे. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत. नागरीकांचा रोष अतिशय योग्य असून गृहखात्याने त्यांच्या संतापाची दखल घेण्याची गरज आहे.पोलीसांना विनंती आहे की कृपया या व्यक्तीची सखोल चौकशी करुन त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. याशिवाय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा.आंदोलकांना पांगण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक सुरू केली आहे. दोषींना ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार याची फाशीची मागणी

बदलापूर मध्ये साडे तीन वर्षाच्या लहान मुलीवर झालेली अत्याचाराची घटना ही महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आहे. या गंभीर प्रकरणाबाबत पोलिस आयुक्त डुंबरे यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली आहे.

पीडित मुलींच्या पालकांची तक्रार न घेता त्यांना अकरा तास पोलिस स्थानकात बसवून ठेवले गेले. या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करावे, ही मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.सदर प्रकरण तीन महिन्यात फास्ट ट्रॅक मध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे.

जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रपतींना मागणी

आपल्या 4 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार तिच्या तोंडून ऐकणं आणि गुन्ह्याची नोंद करण्यासाठी 12 तास वाट बघावी लागणं, पालकांसाठी याहून मोठं दुःख काय असू शकतं..?

बदलापूरमध्ये घडलेला प्रकार प्रचंड वेदनादायी आहे, आणि त्याहून जास्त पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा संताप..! हल्ली समोर येत असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांची भूमिका पाहून खरं तर आश्चर्य वाटतं आणि डोक्यात सणक जाते. आपलं पोलिस प्रशासन इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकतं? मग याचा संताप होऊन लोक का नाही शहर बंद करणार?

महिलांविरोधात घडत असलेल्या घटनांवरून जबाबदारी झटकत आपले सत्ताधारी फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यात मग्न आहेत. फक्त आपली पोळी भाजण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातोय. पण सशक्त आणि सक्षम धोरण आणून ते राबवण्याची या सरकारची कुवत नाहीये. मोठा भाऊ म्हणत आलेल्या केंद्र सरकारकडून यांनी अजून महाराष्ट्र शक्ती विधेयकही मंजूर करून घेतलं नाहीये.

माझी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांना विनंती आहे, की महाराष्ट्र शक्ती विधेयकाला संमती मिळवून द्यावी, जेणेकरून महिलांविरोधातील गुन्ह्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल, आणि राज्यात व देशात अशा गुन्ह्यांविरोधात एक उदाहारण सादर होईल.

एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेचा उदोउदो करत असताना विद्यार्थ्यांचे संरक्षण सरकार करू शकत नाही. एकप्रकारे सरकारची शो बाजी सुरू आहे. उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना शाळेत अशी घटना घडणे हे निषेधार्ह आहे. या गुन्हेगारांना आंध्रप्रदेश राज्यात ज्याप्रमाणे शिक्षा दिली तशी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

बदलापूर येथील एका शाळेत लहान मुलींवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद, क्लेशकारक आणि संतापजनक आहे. या घटनेनंतर बदलापूरमध्ये प्रचंड नागरिक उद्रेक झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी ही केस फासस्ट्रॅकवर चालवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी बदलापुरात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणी संबधित शाळेचे प्रशासन, शिक्षक, आरोपी असो किंवा ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली, अशा सगळ्यांना क्षमा केली जाणार नाही. या घटनेचे कोणी राजकारण करु नये, कारण यातील पिडीत दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी एक स्त्री म्हणून मागणी आहे.

कडक कारवाई करावी- हरभजन सिंग

बदलापूरमधील या घटनेवर हरभजन सिंगने संताप व्यक्त केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली. आम्हा लोकांची काय चूक आहे… मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की, त्यांनी अशा मानसिकतेच्या लोकांवर अतिशय कठोर कारवाई करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0