मुंबई

Badlapur Rape Case : महाराष्ट्र बंदविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात याचिका, न्यायालयाने विचारले हे प्रश्न

•Badlapur Sexual Assault Update बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी विलंबित कारवाईविरोधात विरोधी पक्षांनी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

मुंबई :- बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींच्या लैंगिक छळाच्या विरोधात विरोधी पक्षांनी बंदची घोषणा केली आहे. हे प्रकरण शुक्रवारी (23 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी महाराष्ट्र बंदच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (एमव्हीए) बंद पुकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. बंदमुळे शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांसह सर्वसामान्यांना त्रास होणार आहे.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल डॉ.बीरेंद्र सराफ यांनी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे न्यायालयात सांगितले. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की, जर याबाबत नियम असेल आणि सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वी निर्देश दिलेले असतील तर मग आमच्या हस्तक्षेपाची गरज काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाआणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस यांनी बुधवारी झालेल्या बैठकीनंतर विरोधी पक्षांनी या बंदची घोषणा केली होती. बदलापूर आदर्श शाळेतील घटनेच्या निषेधार्थ विरोधकांचा महाराष्ट्र बंद सरकारच्या निषेधार्थ असणार आहे. या वेळी विरोधक महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. राज्यात गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत, असा आरोप आघाडीतील नेते करत आहेत. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र बंदची गरज असल्याचेही विरोध पक्षांनी म्हटले आहे. तसेच हा बंद केवळ दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात यावं अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0