क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Badlapur Murder News : बदलापुरातील त्या हत्येचे गूढ उकलले

Badlapur Murder News : पत्नीला जबरदस्ती करणाऱ्या मित्राचा काढला काटा डोक्यात लोखंडी हातोडी आणि सळईने वार करून खून केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात बदलापूर पूर्व पोलिसांना यश आले आहे.

बदलापूर :- मित्राच्या पत्नीस जबरदस्ती करणाऱ्या मित्राने मित्राचा काटा काढला आहे. Badlapur Murder News याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला दोन दिवसानंतर अटक केली असून आरोपी हा मित्राच्या खुना बद्दल बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. Badlapur Police Station पोलिसांनी या मृत्यूस आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व येथे अकस्मात मृत्यू म्हणून भारतीय न्यायसंहिता सन‌2023 चे कलम 194 प्रमाणे 11 जानेवारी दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मृत्यूचा प्राथमिक तपास म्हणून पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा यांना फिर्यादी नरेश शंभू भगत (30 वय) यांनी माहिती दिली होती. पोलिसांनी चौकशीकरिता नरेश भगत यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना चौकशी केली असता त्यांच्या उत्तरातून संशयास्पदरितीने आणि उडवाउडीचे उत्तरे दिले होते. म्हणून पोलिसांनी नरेश याची कसून चौकशी केली असता मयत सुकांत शत्रुघ्न परिडा (29 वय) याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मयत सुकांत यांने आरोपी नरेश याच्या पत्नीस जबरदस्ती करायचा हाच राग मनात धरून 11 जानेवारीच्या दरम्यान शिरगाव, एमआयडीसी बदलापूर पूर्व येथे स्वतःच्या घरी मयत सुकांत याला बोलावून त्याच्या डोक्यात लोखंडी हातोडी व सळईने वार करून त्याला जीवे ठार मारल्याची कबुली आरोपी नरेश यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नरेश याच्याविरोधात कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस पथक
सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4 उल्हासनगर, शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा यांनी अत्यंत कुशलतेने उघडकीस आणला असून गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0