क्राईम न्यूज

Badlapur Latest Crime News : बदलापुरात ‘पिशाच्चा’ची भीती दाखवून वृद्धाला 9 लाखांचा गंडा! भोंदू ज्योतिषांच्या टोळीला बेड्या; सोन्याच्या खिळ्यांचा बनाव उघड

Badlapur Latest Scam News : घरात अजून एकाचा मृत्यू होईल अशी घातली होती भीती; कामाख्या देवीच्या पूजेच्या नावाखाली लुबाडले लाखो रुपये आणि दागिने

बदलापूर | अंधश्रद्धेचा आधार घेऊन सुशिक्षित नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या भोंदूगिरीचा एक धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आला आहे. मुंबईतील देवनार (गोवंडी) परिसरात राहणारे 63 वर्षीय चंद्रकांत चिले हे बदलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना, चार भोंदू ज्योतिषांनी त्यांना हेरले आणि त्यांच्या कौटुंबिक संकटाचा फायदा घेत लाखोंची लूट केली. Badlapur Latest Scam News

असा रचला जाळा: ‘सोन्याचे खिळे’ आणि ‘कामाख्या देवी’

आरोपींनी चिले यांना गाठून त्यांच्या घरावर कुणीतरी ‘पिशाच्च’ सोडल्याची भीती घातली. “तुमच्या घरात नुकताच एकाचा मृत्यू झाला असून, योग्य वेळी पूजा न केल्यास लवकरच दुसऱ्या व्यक्तीचाही बळी जाईल,” अशी भविष्यवाणी करत या टोळीने चिले यांचे मानसिक संतुलन बिघडवले. हे संकट टाळण्यासाठी कामाख्या देवीला जाऊन विशेष पूजा करावी लागेल आणि घरात सोन्याचे चार खिळे ठोकावे लागतील, अशी बतावणी करत त्यांनी चिले यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 9 लाख 72 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने उकळले.

अखेर भोंदूगिरीचा पडदा फाटला
अनेक दिवस उलटूनही घरावरील संकटे दूर होत नाहीत आणि केवळ पैशांची मागणी वाढत आहे, हे लक्षात आल्यावर चिले यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी तातडीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चारही आरोपींना बेड्या ठोकल्या.

अटक करण्यात आलेले आरोपी

1.ब्रम्हदत्त इंगळे

2.शिवलिंग इंगळे

3.भवानी इंगळे

4.(आणि अन्य एक साथीदार)

पोलिसांची कायदेशीर कारवाई
पोलिसांनी या चौघांविरुद्ध फसवणुकीसह (BNS), महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी अशाच प्रकारे इतरही कुणाची फसवणूक केली आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago