Badlapur Latest Fraud News : ‘सहा महिन्यांत पैसे दुप्पट मिळतील’, असे आमिष दाखवून माय-लेकांचा गुन्हा
बदलापूर :- कमी वेळेत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून बदलापूरमध्ये पुन्हा एकदा एका मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेने आणि तिच्या मुलाने एका 56 वर्षीय व्यक्तीला तब्बल साडेसात लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Badlapur Latest Fraud News
यातील फिर्यादी बेनेडीक्ट जोसेफ (वय 56) हे उल्हासनगरचे रहिवासी आहेत. प्रार्थनास्थळावर झालेल्या ओळखीमुळे त्यांनी बदलापूरमधील रोहिणी बागडे आणि तिचा मुलगा रुद्र बागडे यांच्याकडे पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला. आरोपींनी त्यांना विश्वासात घेत फक्त सहा महिन्यांत गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळेल, असे आश्वासन दिले.
या आमिषाला बळी पडून, फिर्यादी जोसेफ यांनी 5 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या नवजीवन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यातून 5 लाख रुपये आरोपी रोहिणी बागडेच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यात RTGS द्वारे पाठवले. दुसऱ्याच दिवशी, 6 एप्रिल रोजी त्यांनी आणखी अडीच लाख रुपये त्याच खात्यात जमा केले.
पैशांच्या मागणीला टाळाटाळ
1 ऑक्टोबर 2024 रोजी पैसे परत मिळण्याची मुदत संपल्यानंतर, फिर्यादींनी पैशांची विचारणा केली. त्यावेळी आरोपी रुद्र बागडे याने फोनवर “मला पैशांबाबत काही माहिती नाही आणि पैसे परत देऊ शकत नाही” असे सांगत टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, फिर्यादीने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीनुसार, रोहिणी बागडे आणि रुद्र बागडे या माय-लेकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवूनही फसवणूक झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. Badlapur Police Latest News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…