ठाणे-बदलापूर :- महाराष्ट्र मिरर विवेक राजेंद्र जगताप
नात्यातील विश्वासालाच सर्पदंश देणारी धक्कादायक घटना अखेर उघडकीस आली आहे. पत्नीला विषारी साप चावायला लावून निर्घृण हत्या करून ती नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचणाऱ्या नराधम पतीचा आणि त्याच्या साथीदारांचा तीन वर्षांनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा उघडकीस येताच अवघ्या पाच तासांत मुख्य आरोपीला अटक करून पोलिसांनी आपली तडफदार कामगिरी सिद्ध केली आहे.
जुलै २०२२ मध्ये बदलापूर पूर्व येथील उज्वलदीप अपार्टमेंटमध्ये घडलेली ही घटना सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली होती. मात्र, काळाच्या पडद्याआड दडलेलं सत्य अखेर बाहेर आलं आणि “सापाने नाही, माणसानेच तिला मारलं” हे भयावह वास्तव समोर आलं.
साप, कट आणि थंड डोक्याने आखलेली हत्या!
आरोपी रूपेश आंबेरकर याने पत्नी निरजा आंबेरकर (वय ३९) हिचा खून करण्यासाठी मित्र चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषीकेश चाळके यांच्यासोबत शैतानी कट रचला.
१० जुलै २०२२ रोजी रात्री घरातच गोणीत साप आणून, ‘पाय मालिश’चा बहाणा करत निरजाला जमिनीवर झोपवण्यात आलं. तिच्या अंगावर स्वतःचा नवरा बसलेला असतानाच, ऋषीकेश चाळकेने डाव्या पायाच्या घोट्याजवळ तीन वेळा सर्पदंश घडवून तिचा जीव घेतला.
त्यानंतर पुरावे नष्ट करून, पोलिसांत खोटी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, गुन्ह्याचं पाप मातीखाली गाडता आलं नाही.
तीन वर्षांनी सत्य बाहेर!
दि. ०२/१२/२०२५ रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासात अटक आरोपी ऋषीकेश चाळके याने ई-साक्ष अॅपवर दोन पंचांसमक्ष दिलेल्या कबुलीने संपूर्ण कट उघड केला. त्यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी झपाट्याने हालचाली करत मुख्य आरोपींना गजाआड केलं. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भा.न्या.संहिता कलम ३०२, २०१, १२०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
बदलापूर पोलिसांची कामगिरी!
हा अत्यंत किचकट, थरारक आणि आव्हानात्मक खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस आयुक्त आशितोष डुबेरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण,
अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त सचिन गोरे, सहा. पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, सहा. पोलीस निरीक्षक अनुकूल दोंदे व त्यांच्या पथकाने बजावली आहे.
तीन वर्षांनी का होईना, पण ‘सर्पदंश हत्या’चा बनाव फसला — बदलापूर पोलिसांनी न्यायाला अखेर वाट मोकळी करून दिली!
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…