Badlapur Crime News : बदलापूरात माजी नगरसेवकाला 50 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून चार आरोपींना अटक
बदलापूर :- बदलापुरात हनी ट्रॅप पर्दाफाश केला आहे. Badlapur Honey Trap News अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागण्यात आली. Badlapur Latest Crime News बदलापूरमध्ये माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक देखील केली आहे.
माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिन्याभरापूर्वी एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर एक व्हिडीओ आला. या व्हिडिओत त्यांचे अश्लील फोटो होते. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्याने त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीस हा खोडसाळपणा वाटल्याने वडनेरे यांनी दुर्लक्ष केले. मात्र, खंडणीखोरांचा तगादा वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर, राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास करत बदलापूरमधूनच चौघांना बेड्या ठोकल्या. अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडारकर (28 वय) , दीपक मधुकर वाघमारे (45 वय) आणि पुष्कर हरिदास कदम (28 वय)अशी त्यांची नावे आहेत. यांना न्यायालयाने 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या चौघांपैकी अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दीपक वाघमारे यांच्यावर यापूर्वी अंबरनाथमध्ये एका डॉक्टरच्या घरावर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्यांनी वडनेरे यांना खंडणीसाठी धमकी दिली होती.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…