Badlapur Latest Crime News : सामान्य चेहरा… पण गुन्हेगारी मास्टर माइंड! तांत्रिक तपास आणि गुप्त खबरदारीमुळे सराईत चोरटा जेरबंद
बदलापूर :- ठाणे पोलीस Thane Police आयुक्तालयाच्या हद्दीतील बदलापुर परिसरात घरफोडीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असताना उल्हासनगर गुन्हे शाखा, घटक 4 च्या पथकाने दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करत तब्बल 19 लाख 81 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. Badlapur Latest Crime News
सोनं, चांदी, लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त; बदलापुर आणि शिवाजीनगरमधील 8 गुन्हे उघडकीस
1 जुलै 2025 रोजी बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासात गणेश गावडे या कर्मचाऱ्याच्या तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांना मोठं यश मिळालं. रोशन बाळा जाधव (वय 34) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर-1 मधील अमरडाय कंपनीजवळ, नदीकाठच्या रस्त्यावर फिरताना सापडला.
पोलिसांनी त्याच्याकडून 189.97 ग्रॅम वजनाचे 15 लाख 13 हजार 360 किंमतीचे सोन्याचे दागिने, 10 हजार चांदीचे दागिने, दोन लॅपटॉप (80 हजार), दोन मोबाईल फोन (50 हजार) आणि 3 लाख 28 हजार रोख रक्कम, असा एकूण 19 लाख 81 हजार 360 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व त्यांचे सहकारी पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस हवालदार गणेश गावडे, पोलीस नाईक कुसुम शिंदे, रितेश वंजारी, मंगेश जाधव, रामदास उगले आदींनी पार पाडली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…