क्राईम न्यूज

बदलापूर ; चैन स्नेचींग, तीन लाखाचे मंगळसूत्र चोरट्यांकडून लंपास

Badlapur Chain Snatching News : शाळेत सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रांवर चोरट्यांचा डल्ला

बदलापूर :- पोलिसांकडून चैन स्नेचींग प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. सातत्याने होणाऱ्या सोनसाखळी बाबत पोलिसांकडून (Badlapur Police Station) जनतेला मोठ्या प्रमाणावर सतर्क म्हणून आवाहन करण्यात येते आहे. मात्र बदलापूर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोनसाखळी चोरीमध्ये (Chain Snatching Crime )आरोपींनी महिलेच्या गळ्यातील तीन लाखाहून अधिक किमतीचे मंगळसूत्र चोरी केल्याचे घटना समोर आली आहे. Badlapur Crime News

बदलापूरच्या गणेश नगर परिसरात राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिला आपल्या मुलांना शाळेत सोडवण्यासाठी जात असताना श्याम सावळा इमारतीजवळ चर्च रोड बदलापूर पश्चिम येथे पाठीमागून मोटार सायकलवर दोन अज्ञात व्यक्ती येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून तिथून लंपास झाले आहे. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची किंमत तीन लाख 75 हजार रुपये एवढी होती. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवि कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक थोरवे हे करत आहे. Badlapur Crime News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago