बांगलादेशींविरुद्ध बडगा; ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या घटक-1 पोलिसांची कारवाई 5 जणांना अटक
Thane Police Take Action Against Illegale Bangladeshi : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध ठाणे पोलिसांनी मोठे कारवाई ; ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 मोठी कारवाई करत ठाण्यातून 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
ठाणे :- बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाईचा Thane Police बडगा उगारला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 Thane police Unit 1 पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतून 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावरही काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात त्यामधील आरोपी हा बांगलादेशी नागरिक असून तो ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलीस आक्रमक होऊन ठाण्यातील बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या कारवाईचा बडगा उभारला आहे.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक यांना त्याच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार काही बिघारी काम करणारे नागरिक हे बांगलादेशी असल्याचे माहिती मिळाली होती. पोलिसांनी बातमीच्या आधारे उत्तरशिव नाका, उत्तरशिव, पोस्ट-पडले, ता. जि. ठाणे याठिकाणी बिगारी कामाच्या शोधात आलेल्या तसेच बांगलादेशातुन अवैध्यरित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करीत असलेल्या 05 बांगलादेशी नागरीकांना शिताफीने ताब्यात घेतले.
या बांग्लादेशी नागरिकांकडे भारतात वास्तव करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे पोलिसांनी मागितली. ती त्यांना दाखविता आली नाहीत. हे पाच बांग्लादेशी भारतात विनापरवाना, बेकायदेशीर राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव,उप आयुक्त, गुन्हे, ठाणे ,शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय फराटे, नरसिंग महापुरे, दयानंद नाईक, पोलीस हवालदार प्रशांत निकुंभ, पोलीस नाईक बडगुजर,शशिकांत सावंत, गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे, यांच्या पथकाने केली आहे.