Bacchu Kadu Meet Raj Thackeray : बच्चू कडू यांनी राज ठाकरेंना मराठवाड्यातील कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्याचे दिले आमंत्रण
मुंबई :- प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना मराठवाड्यात काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्याचे औपचारिक आमंत्रण दिले.
या आमंत्रणाला राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा राज ठाकरेंना अभ्यास आहे, पण ‘शेतकरी म्हणून शेतकरी एकत्र येत नाहीत’ ही त्यांची खंत असल्याची माहितीही बच्चू कडू यांनी दिली. या भेटीतून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सर्व स्तरांवर संघर्ष करण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे ते म्हणाले.
या भेटीवेळी उपस्थित असलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांना पाठवले होते आणि त्यांच्या ‘चक्काजाम’ आंदोलनालाही पाठिंबा दिला होता. शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद करण्याची बच्चू कडूंची भूमिका योग्य असून, त्यालाही आमचा पाठिंबा असेल, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
राजकीय युतीबद्दल बोलताना नांदगावकर म्हणाले की, प्रत्येक गोष्ट निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहू नये, सध्या फक्त विचारांची देवाणघेवाण सुरू आहे. या भेटीमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…