मुंबई

Babanrao Madne : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्तमध्ये ओबीसी नेते बबनराव मदने यांना संधी?

•राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी महायुतीचा फॉर्मुला भाजप चार,शिवसेना (शिंदे)‌ चार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चार उमेदवारी देण्याची शक्यता!

मुंबई :- राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषदेच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी प्रत्येकी चार उमेदवारांच्या फॉर्म्युला ठरला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रूपाली चाकणकर यांचे नाव विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्तीच्या पदाकरिता पुढे येत असताना रूपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार गटाविरुद्ध एक पोस्ट केले आहे. एका महिलेला किती पद देणार असा सवाल उपस्थित करत रूपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार गटाला घरचा आहेर दिला आहे. या सर्व परिस्थितीवर अजित पवार गटाकडून सध्या राज्यात जनसन्मान यात्रा च्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे. बबनराव मदने, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ओबीसी नेते, मुंबई अध्यक्ष यांना राज्यपाल नियुक्त आमदार करिता अजित पवार गटाकडून संधी देण्यात यावी अशी मागणी धनगर समाजाकडून केली जात आहे. पक्षश्रेष्ठीकडून पक्षासाठी अहोरात्र कार्य करणारे आणि निष्ठावंत नेत्यांनाच मोठी संधी द्यावी अशी मागणी दबक्या आवाजात सध्या चालू आहे.

रूपाली चाकणकर आणि रूपाली ठोंबरे पाटील यांच्यात झालेल्या कलगीतुऱ्यातून आता धनगर समाजाकडूनही एक नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ओबीसी प्रतिनिधित्व करणारे बबनराव मदने यांना संधी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तसेच मदने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निश्चित आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळवून अजित पवार गटाला याचा फायदा होणार आहे असे धनगर समाजाकडून बोलले जात आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटावर धनगर समाज नाराज आहे .राज्य आणि जिल्हा पातळीवर धनगर समाजाला नेतृत्व करण्याची संधी कुठेही दिली गेली नाही.याचा विचार निश्चित अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला पाहिजे नाहीतर धनगर समाजाच्या नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो.

Babanrao Madne कोण आहे?

बबनराव मदने धनगर समाजातून येतात गेली 25 वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत म्हणून काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.बारामती लोकसभा मतदारसंघातील खामगाव दौंड तालुक्यातील ते मुळचे‌ रहिवासी असून त्याचे सामाजिक राजकीय काम मुंबई सह संपूर्ण राज्यभर आहे.धनगर/ओबीसी समाजासाठी गेली अनेक वर्षे काम करीत आहे.धनगर समाजाच्या s t आरक्षण करीता खूप मोठा संघर्ष गेली अनेक वर्षं करीत आहेत ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी रस्त्यावर उतरून कित्येक वेळा आंदोलन संघर्ष केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0