Babanrao Madane : विधान परिषदेवर अजित पवार गटाकडून ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने डावलले, धनगर समाज नाराज?
Babanrao Madane News : अजित पवार गटाकडून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे आमदारांची यादी पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी, अजित पवार गटात गटबाजी?
मुंबई :- राज्यपाल नियुक्त 12 सदस्य पैकी राज्यपालांनी सात सदस्यांना विधान परिषदेच्या आमदारकीचे संधी दिली. यामध्ये भाजपचे 3,शिवसेना शिंदे गटाचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 2 संधी देण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून विधान परिषदेवर मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना संधी देण्यात आली तर मुस्लिम चेहरा म्हणून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील धनगर समाजाच्या नेत्यांना डावळल्याने धनगर समाजामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. गेले 30 वर्षे धनगर समाजाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने Babanrao Madane यांना संधी नाकारल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे म्हटले आहे.
अजित पवार यांनी शाहू, फुले, आंबेडकर, यांच्या विचाराने पुढे घेऊन जाणार आहे असल्याचे आपल्या प्रत्येक भाषणात म्हणतात, परंतु धनगर समाजाच्या ज्यावेळी मुद्दा येतो त्यावेळी त्यांना अनेक संधींपासून वंचित ठेवले जाते असे धनगर समाजाकडून म्हटले जात आहे. बबनराव मदने हे मागील 30 वर्षांपासून धनगर समाजाच्या हक्का करिता अनेक वेळा प्रयत्नशील असतात सातत्याने धनगर समाजाच्या मागण्यांकरिता रस्त्यावर उठून शासनाच्या दरबारी जातात परंतु आज विधान परिषदेमध्ये धनगर समाजाचा एक प्रतिनिधी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत ठोस मुद्दे मांडून धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्नशील होते. परंतु पक्षाने त्यांना संधी नाकारल्याने यंदाच्या विधानसभेवर त्याचा परिणाम होऊ शकतो असे म्हटले जात आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर चेहरा म्हणून बबनराव मदने यांना संधी मिळावी अशी मागणी धनगर समाजाकडून केली जात आहे.
बबनराव मदने कोण आहे?
बबनराव मदने धनगर समाजातून येतात गेली 25 वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत म्हणून काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.बारामती लोकसभा मतदारसंघातील खामगाव दौंड तालुक्यातील ते मुळचे रहिवासी असून त्याचे सामाजिक राजकीय काम मुंबई सह संपूर्ण राज्यभर आहे.धनगर/ओबीसी समाजासाठी गेली अनेक वर्षे काम करीत आहे.धनगर समाजाच्या s t आरक्षण करीता खूप मोठा संघर्ष गेली अनेक वर्षं करीत आहेत ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी रस्त्यावर उतरून कित्येक वेळा आंदोलन संघर्ष केला आहे.