Baban Rao Madnae On Maratha Samaj : मराठा समाजाला स्वातंत्र आरक्षण देण्याला ओबीसी नेते, ओबीसी समाजाचा विरोध नाही.बबनराव मदने, मुंबई ओबीसी विभागाचे अध्यक्ष
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ओबीसी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे,
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत गैर समज पसरवून विरोधक ओबीसी आणि मराठा समाजात राजकीय फायद्यासाठी खोटा प्रचार करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या विषयी मराठा आणि ओबीसी समाजात चुकीचा प्रचार लोकसभेच्या वेळी केला तसाच प्रयत्न राज्यातील विधानसभा निवडणुकीत करण्याचे षडयंत्र विरोधकांकडून रचले जात आहे या मागे अदृश्य शक्तीचा मोठा हात आहे. – बबनराव मदने
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग मुंबई बैठक पार पाडली
मुंबई मध्ये ओबीसी विभागाची महत्वाची बैठक झाली यामध्ये.ओबीसी आरक्षण या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे.ओबीसी विभागाचे सर्व जिल्हा अध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष तसेच प्रदेश पदाधिकारी मुंबई पदाधिकारी* यांनी या बैठकीला उपस्थित असून ओबीसी आरक्षण मध्ये मराठा समाजाला आरक्षणाला देण्यात येवू नये हि भूमिका ओबीसी नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे.
मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देवू नये
मराठा समाजाला जे वेगळं आरक्षण दिले आहे त्या आरक्षणाला कोणाचा विरोध नाही यांच्या भूमिके सोबत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – ओबीसी विभाग यांच्या बरोबर आहे आणि पूर्ण ताकदीनिशी उभा राहणारच मग कुठलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल हा ठाम निर्णय ओबीसी बैठकीत घेण्यात आलाआहे .महायुतीचे सरकार कुठेतरी एका समाजाला अधिक महत्त्व देत आहे असे दिसून येते हि भावना ओबीसी समाजाची नेत्यांची झाली आहे.तसे सरकारच्या कृतीतून दिसून येते असे मत बबनराव मदने यांनी व्यक्त केले जरी आम्ही सरकार मध्ये असलो तरी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाला ठाम विरोध राहणार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे हे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.तरी काही विरोधक अजित पवार यांना धनगर ओबीसी समाजाचे विरोधाक आहेत .हे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात .हा गैर समज पसरवून लोकसभा निवडणुकीत या खोट्या प्रचाराचा फटका निश्चित बसला आहे
हे मान्यच करावे लागेल.
धनगर / ओबीसी समाजाला आरक्षण बाबत विश्वास ठोस निर्णय जर या सरकारने घेतला नाही तर महायुतीला लोकसभे पेक्षा विधानसभेला याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रामुख्याने धनगर ओबीसी समाजाचे राज्यभर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाने पाठिंबा दर्शविला आहे.
बबनराव मदने – मुंबई अध्यक्ष ओबीसी विभाग – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…