क्राईम न्यूज

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींची हत्या करणारा आरोपी अल्पवयीन नाही, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध : पुणे कनेक्शन आलं समोर

Baba siddique shot dead

  • शुभम लोणकरच्या भावाला पुण्यातून अटक

पुणे, दि. १४ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Baba Siddique Shot Dead

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांची शनिवारी रात्री ९ च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) वांद्रे या ठिकाणी असलेल्या त्यांच्या मुलाच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी तीन जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात गुरनैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांनाही अटक करण्यात आली होती. आरोपी धर्मराज याने अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. ज्यानंतर त्याची ऑसिफिकेशन चाचणी म्हणजेच वय निश्चितीसाठीची हाडांची चाचणी करण्यात आली. ज्यात तो अल्पवयीन नाही हे समोर आलं आहे. तसेच बाबा सिद्दीकी गोळीबारच पुणे कनेक्शन समोर आलं आहे.

पुण्यातून एकाला अटक

बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरविण्यात येत आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन आरोपी फरार आहेत. दरम्यान, आता याप्रकरणी फेसबुक पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या एका संशयित आरोपीच्या भावाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर (२८) असं या आरोपीचं नाव आहे. दोघेही भाऊ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Maharashtra Mirror

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

19 hours ago