Maharashtra Political Update : “तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे…” फडणवीसांची ऑफर, ठाकरे भेटीस गेले!

•Thackeray-Fadnavis Meeting : विधान परिषदेच्या सभापतींच्या कार्यालयात फडणवीस-ठाकरे यांची 20 मिनिटांची ‘गोपनीय’ भेट
मुंबई | महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या राजकारणात काल मिश्कील मजकुराने भरलेली एक अनपेक्षित राजकीय ऑफर चर्चेचा विषय ठरली होती, तर आज त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Thackeray Fadnavis Meeting यांच्यात 20 मिनिटांची खास भेट झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचे वारे वाहू लागले आहेत.
ही भेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात पार पडली. ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, वरुण सरदेसाई, सचिन आहिर, सुनील राऊत आदी उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी फडणवीस यांना “हिंदी सक्ती हवी कशाला?” या विषयावरील विविध संपादकांचे लेख असलेले एक संकलित पुस्तकही भेट दिलं.

फडणवीसांची ऑफर आणि ठाकरे यांची प्रतिक्रिया
काल विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अंबादास दानवे पुन्हा याच पदावरच काम करतील असं नाही. पण उद्धवजी, तुमच्यासाठी सत्ताधारी बाकावर यायचा ‘स्कोप’ नक्कीच आहे!”
या विधानावर उद्धव ठाकरे यांनी सभागृहात हसत प्रतिक्रिया दिली. मात्र, नंतर पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले –“हा प्रश्न नुसता बाकाचा नाही, प्रसंग बडा बाका आहे… सभागृहात अशा खेळीमेळीच्या गोष्टी होत असतात, त्याही खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात.”
फडणवीस यांच्या ‘उघड ऑफर’नंतर ठाकरे यांनी आज घेतलेली भेट ही केवळ औपचारिक सौजन्याची होती का, की आंतरिक राजकीय हलचालींची सुरुवात? या 20 मिनिटांच्या भेटीने पुन्हा एकदा “गाठी-भेटी राजकारणाला नवी वळणं देतात” हे सिद्ध केलं आहे.


