मुंबईठाणे
Trending

Nashik Politics : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! उपनेते अद्वय हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार

Uddhav Thackeray Nashik Shivsena News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘मालेगाव’मध्ये राजकीय उलथापालथ; भुसेंचे कट्टर विरोधक हिरे यांची महायुतीत एन्ट्री

मुंबई :- महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस संपत असताना नाशिकच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे Advya Hire यांनी अखेर आपल्या राजकीय भूमिकेत मोठा बदल करत शिवसेनेचा निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांशी सुरू असलेल्या त्यांच्या संपर्काच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, आज मंगळवारी (18 नोव्हेंबर) ते मुंबईतील भाजप कार्यालयात अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

हिरे यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकच्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा आणि महत्त्वाचा धक्का मानला जात आहे.

अद्वय हिरे यांच्यासोबत अपूर्व हिरे, प्रसाद हिरे आणि तुषार शेवाळे हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने स्थानिक पातळीवरील भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढेल. विशेष म्हणजे, अद्वय हिरे हे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. मालेगाव बाह्य मतदारसंघात भुसे यांची पकड मजबूत होत असतानाच, हिरे यांनी महायुतीत प्रवेश करत आपले राजकीय पुनरागमन साधले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत हिरे यांनी दादा भुसे यांना कडवी झुंज दिली होती, त्यामुळे त्यांच्या या नव्या राजकीय पावलाने मालेगाव आणि नाशिकचे राजकारण आगामी काळात अधिक तापण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0