Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट 3 महिन्यांपूर्वी सुरू झाला, यूट्यूब पाहून शूट करायला शिकले
Baba Siddique Murder Latest Update : आरोपींनी एकमेकांशी चॅट करण्यासाठी स्नॅप चॅट आणि इन्स्टाग्राम कॉलिंगचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई :- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकीच्या Baba Siddique हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला गेल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकवेळा आरोपी बाबा सिद्दीकी यांच्या घराजवळही शस्त्राशिवाय गेले होते.मुंबई क्राईम ब्रँचकडून मिळालेल्या Mumbai Crime Branch माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे संपूर्ण नियोजन पुण्यात करण्यात आले होते.
मुंबई क्राईम ब्रँचने आतापर्यंत 15 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींचा समावेश आहे. बाबा सिद्दीकी खून प्रकरणात अटक करण्यात आलेला चौथा आरोपी हरीश हा मधला माणूस म्हणून काम करत होता.अटक आरोपी प्रवीण आणि शुभम लोणकर (फरार आरोपी) यांनी अटक केलेल्या शूटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना दोन लाख रुपये दिले होते आणि ही रक्कम चौथा आरोपी हरीश याच्यामार्फत पाठवली होती.
गोळीबार करणाऱ्यांना पैशांसोबत दोन मोबाईल फोनही देण्यात आले आहेत. हरीश गेल्या नऊ वर्षांपासून पुण्यात राहत होता. आरोपींनी चॅटिंगसाठी स्नॅप चॅट ॲपचा वापर केला आणि कॉलिंगसाठी इन्स्टाग्रामचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे.गुरमेल सिंग आणि धरमराज कश्यप हे आरोपी शूटर यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शूट करायला शिकले. आरोपींनी कुर्ला आणि पुणे येथे बंदुकीतून गोळीबार करण्याचा सराव केला होता.