Awhad vs Pawar : लोकांच्या डोक्यातुन सरंजामशाही काही… आमदार जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad Reply Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर आता शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर दिले आहे, अजित पवार यांनी सभेत “मी शरद पवार चा मुलगा..,”
मुंबई :- अहमदनगर येथे सभेत राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी एक वक्तव्य केले होते. अजित पवार Ajit Pawar भाषणात म्हणाले की, मी शरद पवार चा मुलगा असतो तर मला चांगले संधी मिळाली असती. मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला कोणत्याही प्रकारचे चांगले संधी मिळत नाही.. असे वक्तव्य अजित पवार यांनी सभेत केले त्यांच्या या वक्तव्याला आता शरद पवार गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, राजराजवाडे कधीच संपले आहे. मात्र अजूनही काही लोकांच्या डोक्यातून सरंजामशाही जात नाही. असे म्हणत अजित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. Awhad vs Pawar
जितेंद्र आवड आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की,राजराजवाडे कधीच संपले. मात्र, अजूनही काही लोकांच्या डोक्यातून सरंजामशाही काही जात नाही. रक्ताच्या वारसांनीच सिंहासनावर बसले पाहिजे; तो त्यांचाच हक्क आहे, अशीच मानसिकता अजित पवार यांच्या वाक्यातून दिसून येते. तुमच्यापेक्षा ज्येष्ठ , तुमच्यापेक्षा प्रगल्भ नेते २००४ मध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांच्या जवळ होते. त्यामध्ये आर.आर.पाटील, जयंत पाटील, डाॅ. पद्मसिंह पाटील, दत्ता मेघे, विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ आदी नेते होते. पण, तुम्ही केवळ रक्ताचे वारसदार आहात, म्हणून तुम्हालाच द्यायला पाहिजे, या भ्रमात तुम्ही का आहात? आणि सरंजामशाहीच्या विरोधातच आदरणीय शरद पवारसाहेब आहेत. नाही तर त्यांनी उदयनराजेंविरोधात एक साधा माथाडी कामगार शशिकांत शिंदे दिला नसता. Awhad vs Pawar
आता निवडणूक संपली. जेवढ्या शिव्या द्यायच्या होत्या. तेवढ्या शिव्या देऊन झाल्या. जेवढ्या गडबडी निवडणुकीत करायच्या होत्या. तेवढ्या करून झाल्या. आता कशाला शरद पवार… शरद पवार करताय? तुम्हाला जेवढं दिले; त्यावर जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की,तेवढे त्यांच्या सख्या मुलीलाही दिलं नाही. केंद्रात मंत्री केले ते सुर्यकांताताई पाटील आणि आगाथा संगमा यांना! मात्र, सुप्रियाताई यांना केंद्रात असे कोणतेही मोक्याचे पद दिले नाही. कारण, शरद पवारसाहेबांचा संरजामशाहीवर विश्वासच नाही आणि तुमच्या विचारांतून सरंजामशाही जातच नाही. Awhad vs Pawar