Awhad vs Padalkar Clash: “मलाच मारायला आले होते, पोलिस मात्र वडापाव खाऊ घालत होते” – जितेंद्र आव्हाडांचा संतप्त आरोप
मुंबई | विधान भवनासारख्या उच्चस्तरीय प्रशासकीय परिसरात गुरुवारी (17 जुलै) अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील राजकीय मतभेद आता रस्त्यावर उतरल्याचे दृश्य समोर आले. Awhad vs Padalkar Clash दोन्ही नेत्यांचे समर्थक विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भिडले. जमावाच्या हाणामारीत कपडे फाटले, शिवीगाळ झाली, आणि कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर गंभीर आरोप करत विधान भवनाच्या परिसरात ठिय्या आंदोलन छेडले. “हे कार्यकर्ते मलाच मारायला आले होते. त्यांच्यावर अजूनही गुन्हे दाखल नाहीत. उलट आमचेच कार्यकर्ते पोलिसांनी उचलून नेले,” असा संतप्त सवाल करत त्यांनी पोलीस यंत्रणेवरच सवाल उभा केला.
“पोलीस वडापाव खाऊ घालत होते!”
“मला मारायला पाच कार्यकर्ते आले होते, आणि पोलीस त्यांना वडापाव व तंबाखू पुरवत होते,” असा खळबळजनक आरोप आव्हाड यांनी केला. त्यांनी याचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचा दावा करत, काही पोलिस अधिकारीही या घटनांमध्ये सहानुभूती दाखवत असल्याचे सांगितले.
राजकीय तापमान चिघळण्याची शक्यता
या प्रकारामुळे विधान भवनाच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “सभागृहाचं कामकाज संपलं की कार्यकर्त्यांना सोडू, असं सचिवांनी सांगितलं होतं, पण त्याऐवजी त्यांना पोलीस ठाण्यात का नेलं?” असा सवाल करत आव्हाड यांनी विरोधाचा आवाज अधिकच बुलंद केला.
दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सीसीटीव्ही फुटेज मागवून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. मात्र, ही घटना सरकारच्या ‘कायदा आणि सुव्यवस्था’ व्यवस्थापनावर मोठं प्रश्नचिन्ह उभं करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…