मुंबई

Awadhesh Prasad : फैजाबादचे सपा खासदार अवधेश प्रसाद मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Awadhesh Prasad Meet Uddhav Thackeray : महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे (एसपी) अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यूपीच्या फैजाबाद मतदारसंघाचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासोबत मातोश्रीवर पोहोचले.

मुंबई :- यूपीच्या फैजाबाद मतदारसंघातील सपा खासदार अवधेश प्रसाद Awadhesh Prasad शनिवारी (20 जुलै) मातोश्रीवर पोहोचले. शिवसेना (UBT) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray ) सपा खासदार अवधेश प्रसाद यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी अवधेश प्रसाद यांच्यासोबत मातोश्रीवर पोहोचले. कारमध्ये भिवंडीचे आमदार रईस शेख हेही उपस्थित होते. Awadhesh Prasad Meet Uddhav Thackeray

महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे शुक्रवारी मुंबई शक्तिप्रदर्शन

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने रणशिंग फुंकले. महाविकास आघाडीत समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी करणार असून राज्यात स्थापन होणाऱ्या संभाव्य सरकारमध्ये समाजवादी सामील होणार आहे.समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उत्तर प्रदेशमधील समाजवादीच्या 31 खासदारांचा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला होता. या सत्काराला मुंबईतील उत्तर भारतीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. Awadhesh Prasad Mumbai Bhushan

उत्तर प्रदेशातील समाजवादीच्या 31 खासदारांनी शुक्रवारी सकाळी मणिभवनला भेट दिली. त्यानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दुपारी शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख होते. Awadhesh Prasad Meet Uddhav Thackeray

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0