•सोन्याच्या व्यापाऱ्याकडून अविनाश जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल, पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
ठाणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव Avinash Jadhav यांच्यावर पाच कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याच्या व्यापाऱ्याने अविनाश जाधव यांच्या विरोधात आरोप दाखल केला आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी मारहाण व कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (55 वर्षे) यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव Avinash Jadhav यांच्याविरोधात भादंवि कलम 385,143,147,323,120 ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार जैन यांनी ठक्करला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते. त्यावेळी जाधव त्यांचे सहकारी, अंगरक्षक व सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव Avinash Jadhav यांनी आपल्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने सुडाच्या भावनेतून केले असल्याचे स्पष्ट केले आहे. एका व्यक्तीने दूरध्वनीवरून कॉल करून मला आणि माझ्या पत्नीला दाबून ठेवले असे सांगितले त्यावेळी मी पोलिसांसह गेलो होतो. असे अविनाश जाधव यांनी सांगितले. ग्राहक आणि व्यापारी यांच्यातील वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…