ठाणेमुंबई

Shivsena Shinde Group : राज्यात विविध पक्ष व संघटनांचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Shivsena Shinde Group Latest News : पालघर, डहाणू, संभाजीनगर, सोलापूरसह विविध जिल्ह्यांतील नेत्यांचा सहभाग,‘गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक’ अभियानास मिळणार चालना

मुंबई :- राज्याच्या विविध भागांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षविस्ताराला मोठे बळ दिले आहे. काल मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात पालघर, डहाणू, छत्रपती संभाजीनगर, दादरा-नगर हवेली, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे व सोलापूर जिल्ह्यांतील विविध राजकीय व सामाजिक संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशांमध्ये पालघरचे माजी आमदार अमित घोडा काँग्रेसचे सरचिटणीस जितू पटेल, आगवन गावचे सरपंच रुपजी कौल,मनसेचे अनिकेत माच्छी, रिक्षा संघटनेचे जगन्नाथ ठाकूर, तसेच विपुल रमण पटेल,शोभा खताळ, संदीप पाटील,रामलीला प्रचार समितीचे पंडित राजू शर्मा यांचा समावेश होता.

छत्रपती संभाजीनगरचे उमेश महिरे दादरा-नगर हवेलीतील हेमंत झा,अशोक तिवारी,महेंद्र कटारिया धुळे जिल्ह्याचे नितीन पाटील,हेमाताई हेमाडे,सरोज कदम सोलापूरचे ज्योतिराम मदने, बलभीम पाटील मनोज नरसाणे,श्रीराम परदेशी,गणेश परदेशी यांचाही यांनी पक्षात प्रवेश होता.

एकनाथ शिंदे म्हणाले की,,‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून पाच कोटी नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे. ही कामगिरी पाहूनच लोक शिवसेनेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे नेत ‘गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक’ हे ध्येय गाठण्यासाठी सर्वांना एकत्र काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0