मुंबईठाणे
Trending

Eknath Shinde: मुंबईच्या महापौराचा पेच आता ‘दिल्ली’ दरबारी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुप्त दिल्ली दौरा; अडीच वर्षांच्या महापौरपदासाठी आग्रह?

Eknath Shinde Delhi Visit : भाजपच्या 89 जागांविरुद्ध शिंदेंच्या 29 जागांचे ‘उपद्रवमूल्य’; अमित साटम आणि राहुल शेवाळे यांचीही दिल्लीत उपस्थिती; मुंबईसह ठाणे-कल्याणच्या सत्तेचेही होणार वाटप

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीत Mumbai BMC Election भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठ्या पक्षाचा बहुमान मिळवला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 29 जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, 114 या बहुमताच्या आकड्यासाठी भाजपला शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांची नितांत गरज आहे. याच संधीचा फायदा घेत शिंदे गटाने मुंबईत अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी लावून धरली आहे. हा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये असतानाच एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. Maharashtra Political Latest News

गुप्त दौऱ्याने वेधले लक्ष एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. दिल्लीत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधला. विशेष म्हणजे, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे हे आधीपासूनच दिल्लीत असून तेथील नेत्यांशी संपर्कात आहेत. मुंबईच्या महापौरपदासह स्थायी समिती आणि इतर वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदांच्या वाटपावरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

काय आहे शिंदे गटाची रणनीती?

1.अडीच वर्षांचा फॉर्म्युला: शिंदे गटाने भाजपला पहिल्या अडीच वर्षांसाठी किंवा दुसऱ्या अडीच वर्षांसाठी महापौरपद देण्याची मागणी केली आहे.

2.बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष: “हे बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने मुंबईचा महापौर शिवसेनेचाच असावा,” ही शिवसैनिकांची भावना असल्याचे शिंदे गटाकडून पटवून दिले जात आहे.

3.इतर महापालिकांचा ‘बॅार्टर’ डिल: मुंबईत भाजपला पाठिंबा देण्याच्या बदल्यात ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाला पूर्ण स्वातंत्र्य आणि महापौरपद मिळावे, असा प्रस्तावही समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0