महाराष्ट्रमुंबई
Trending

Atul Parchure Passed Away: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते अतुल परचुरे यांचे 57 व्या वर्षी निधन

Atul Parchure Passed Away: मराठी नाट्य, सिनेमा, हिंदी सिनेमा मध्ये कॉमेडी नायकाची भूमिका बजाविणारे सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली!

मुंबई :- मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेते म्हणजे Comedy Actor अतुल परचुरे यांचे 57 व्या वर्षी निधन झाले आहे. Atul Parchure Passed Away त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना कर्करोगाने घेरले होते. मात्र या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरु होते. आज (14 ऑक्टोबर) अतुल यांच्या निधनाची माहिती समजताच कुटुंबियांवरही दुखाचा डोंगर कोसळला आहे.

नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अतुल यांच्या जाण्याने मराठी कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दरम्यान, चित्रपट क्षेत्रातील त्यांचे मित्र, सहकलाकार व त्यांचे चाहते समाजमाध्यमांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिंदे यांनी ‘एका चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट’ अशी पोस्ट समाजमाध्यमांवर केली आहे.

चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0