Categories: Uncategorized

Attack on Pune Police | वानवडी : बी टी कवडे रोडवर पोलीस अंमलदार यांना मारहाण

  • पुण्यात पोलिसांचा ‘धाक’ संपुष्टात !

पुणे, दि. ९ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : Attack on Pune Police

बी टी कवडे रोड येथे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या टोळक्याला आवर घालण्यासाठी गेलेल्या वानवडी मार्शलला मारहाण झाली आहे. पोलिसांवर वारंवार घडणाऱ्या हल्ल्याने पोलिसांचा ‘धाक’ संपुष्टात आल्याचे दिसते. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथडा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Attack on Pune Police

अनिकेत वाबळे, पोलीस अंमलदार वानवडी पोलीस ठाणे असे मारहाण झालेल्या पोलिसांचे नाव आहे.

संशयित आरोपी नयन शिवाजी भंडलकर व आशिष शिवाजी भंडलकर यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. ९ रोजी २ च्या सुमारास रोझरी सोसायटीच्या समोर, उदय बाग, बी टी कवडे रोड येथे काहीजण दारू पिऊन गोंधळ करत असल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला मिळाला होता. यावेळी ड्युटीवर असणारे मार्शल अनिकेत वाबळे हे त्यांच्या सहकाऱ्यासह घटनास्थळी गेले. यावेळी गोंधळ घालणाऱ्या संशयित आरोपींना समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस अंमलदार अनिकेत वाबळे यांना धक्का बुक्की करून मारहाण केली.

Maharashtra Mirror

Share
Published by
Maharashtra Mirror

Recent Posts