क्राईम न्यूजमुंबई
Trending

Atal Setu Suicide News : मानसिक तणावाने घेतला हयातिचा अंत; जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरची अटल सेतूवरून उडी

Atal Setu Suicide News : नवी मुंबईतील कळंबोली येथे राहत असलेल्या डॉ. ओमकार कवितके यांचा मृत्यू; आत्महत्या मागचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात

मुंबई | शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी आणि मन सुन्न करणारी घटना सोमवारी रात्री घडली. जे. जे. रुग्णालयात वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉ. ओमकार भगवान कवितके (32 वय) यांनी अटल सेतूवरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केली.

डॉ. ओमकार यांना लवकरच व्याख्याता पदावर पदोन्नती होणार होती. त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास प्रगतीशील असतानाही, मागील काही दिवसांपासून ते गंभीर मानसिक तणावात होते. याच कारणास्तव रुग्णालय प्रशासनाने त्यांना मानसोपचार उपचार घेण्याचा सल्ला आणि सुविधा दोन्हीही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.

नवी मुंबईतील कळंबोली येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. ओमकार कवितके यांची आत्महत्या अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण करून गेली आहे. पोलिसांना आत्महत्येसंदर्भात कोणतीही चिट्ठी सापडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या टोकाच्या निर्णयामागील नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, प्रेमभंगामुळे ते अत्यंत तणावात होते, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.वैद्यकीय क्षेत्रात रात्रंदिवस झटणाऱ्या डॉक्टर्सना देखील मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेलं असू शकतं, हे वास्तव पुन्हा अधोरेखित झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0