मुंबई

Cooperate Election Postponed : राज्यात 285 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, सरकारचा मोठा निर्णय

• अतिवृष्टी आणि शेतीकामांमध्ये व्यस्त असल्याने शेतकऱ्यांना दिलासा; 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती

मुंबई :- राज्यभरातील सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँकांसह एकूण 285 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारने बुधवारी (20 ऑगस्ट) स्थगिती दिली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या ३ हजार 188 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर थांबवण्याचा हा महत्त्वाचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही स्थगिती लागू राहणार आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत 30 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 80 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असून, त्यापैकी 15 जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी खरीप हंगामातील शेतीकामांमध्ये पूर्णपणे व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात त्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या संस्थांना वगळण्यात आले

राज्य सरकारने हा निर्णय घेताना काही अपवाद ठेवले आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे, अशा संस्थांना या स्थगितीमधून वगळण्यात आले आहे. तसेच, ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण पदाधिकाऱ्यांची निवड बाकी आहे, अशा संस्थांनाही या निर्णयामधून वगळण्यात आले आहे. याशिवाय, न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यांनाही या स्थगितीचा नियम लागू होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0