क्रीडा
Trending

आशिया चषक 2025: टीम इंडिया आज मैदानात उतरणार! सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ‘मिशन आशिया कप’ सुरु

Asia Cup 2025 : पहिला सामना युएईविरुद्ध, शुभमन गिलच्या एन्ट्रीने संजू सॅमसनचे स्थान धोक्यात?

ANI :- आशिया चषक 2025 स्पर्धेचा आजचा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खास आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपला पहिला सामना आज संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार असून, भारतीय संघ विजयाची सलामी देऊन स्पर्धेत दमदार सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. Asia Cup Latest Update 2025

काल अफगाणिस्तानने हाँगकाँगला हरवून स्पर्धेची विजयी सुरुवात केली. आता आज भारतही विजयाची नोंद करून आगेकूच करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या सामन्यासाठी भारताची अंतिम प्लेइंग इलेव्हन कोणती असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघातील काही महत्त्वाच्या खेळाडूंच्या निवडीवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संघातील काही प्रश्नांची उत्तरे मिळणार

या स्पर्धेत सलामीवीर शुभमन गिल संघात परतल्यामुळे संजू सॅमसनचे स्थान धोक्यात आले आहे. संजूला संघात संधी मिळणार का? विकेटकीपर कोण असेल? तसेच, फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांची संख्या किती असेल? असे अनेक प्रश्न आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादवने सॅमसनच्या निवडीबाबत ‘योग्य काळजी घेऊ’ असे म्हटले होते, त्यामुळे आजच्या सामन्यात त्याचे स्थान पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

या सामन्याला भारत केवळ एक सराव सामना म्हणून पाहणार आहे, कारण टीम इंडियाची खरी कसोटी 14 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, हर्षित राणा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0