Asia Cup Latest Update : अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताची बाजी; अर्शदीप सिंगची अचूक गोलंदाजी ठरली टर्निंग पॉईंट
Asia Cup 2025 :- आशिया चषक 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर फारसा महत्त्वाचा नसलेला अखेरचा साखळी सामना भारत आणि श्रीलंका या दोन संघात अखेरच्या क्षणापर्यंत थरारक ठरला. श्रीलंकेने भारताला कडवी झुंज दिली, मात्र सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर भारताने विजय मिळवत या स्पर्धेत अजेय राहण्याचा मान कायम राखला.
अखेरच्या षटकाचा थरार आणि सुपर ओव्हर
भारताने विजयासाठी दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या पथुम निसांकाच्या शतकी खेळीमुळे (101 धावा) सामना अखेरच्या षटकापर्यंत पोहोचला. अखेरच्या 6 चेंडूत श्रीलंकेला 12 धावांची गरज असताना, गोलंदाजीची जबाबदारी हर्षित राणाकडे होती.हर्षितने पहिल्या चेंडूवर शतकवीर निसांकाला बाद केले.
अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेला 2 धावांची गरज असताना, शनाकाने दोन धावा घेतल्या. यावेळी दुसरी धाव घेतल्यानंतर शनाका डाईव्ह मारून झोपून राहिला. भारतीय खेळाडू चेंडू टिपण्यात चुकले असल्याने, जर शनाका उठला असता तर तिसरी धाव झाली असती. पण दोन धावांवरच खेळ थांबला आणि सामना बरोबरीत सुटल्याने निर्णय सुपर ओव्हरवर गेला.
सुपर ओव्हरचा पहिलाच चेंडू ठरला निर्णायक
सुपर ओव्हरमध्ये भारताकडून अर्शदीप सिंगने अचूक गोलंदाजी करत सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
श्रीलंकेची फलंदाजी: अर्शदीपच्या पहिल्याच चेंडूवर कुसल परेरा बाद झाला. श्रीलंकेच्या फलंदाजांना फारशी धावसंख्या उभारता न आल्याने भारताला विजयासाठी केवळ 3 धावांचे लक्ष्य मिळाले.
भारताची फलंदाजी: भारताकडून शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आले. श्रीलंकेकडून हसरंगा गोलंदाजी करत होता. सूर्याने पहिल्याच चेंडूवर कमालीचा कव्हर ड्राईव्ह खेचला आणि गिलसोबत 3 धावा काढत पहिल्याच चेंडूवर भारताला विजय मिळवून दिला!
सामन्याचा धावता आढावा भारताची विक्रमी धावसंख्या:
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. भारताने 5 बाद 202 धावांचा डोंगर उभा केला, जी आशिया चषक 2025 मधील सर्वाेच्च धावसंख्या ठरली. या मोठ्या धावसंख्येचा पाया अभिषेक शर्माने (61 धावा) पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी करत रचला.
श्रीलंकेची कडवी झुंज:
203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने पहिल्याच षटकात विकेट गमावली. पण, यानंतर पथुम निसांका आणि कुसल परेरा (58 धावा) यांनी शतकी भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. निसांकाने अवघ्या 52 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 101 धावा ठोकत यंदाच्या आशिया चषकातील पहिले शतक झळकावले.या विजयासह अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…