क्रीडा
Trending

Asia Cup 2025 : आशिया चषकात भारताचा ओमानवर 21 धावांनी विजय, हार्दिकचा अविश्वसनीय झेल ठरला टर्निंग पॉइंट

Asia Cup 2025 : नवख्या ओमान संघाची भारतीय गोलंदाजांची धुलाई; दोन फलंदाजांची अर्धशतकी खेळी

Asia Cup 2025 :– आशिया चषकाच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने ओमानवर 21 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना नवख्या ओमानच्या फलंदाजांनी चांगलीच झुंज दिली, त्यामुळे टी-20 वर्ल्ड चॅम्पियन संघाला हा विजय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला.

भारताची फलंदाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 188 धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 56 धावांची दमदार खेळी केली. सलामीवीर अभिषेक शर्माने 38 आणि तिलक वर्माने 29 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

ओमानची कडवी झुंज

189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. कर्णधार जतिंदर सिंगने 33 चेंडूत 32 धावांची दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आमिर कलीम (64 धावा, 46 चेंडू) आणि हमद मिर्झा (52 धावा, 33 चेंडू) यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी करत 90 हून अधिक धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फलंदाजीमुळे ओमानचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता.

हार्दिक पंड्याचा मॅच-विनिंग झेल

ओमानच्या फलंदाजांनी धावांचा वेग वाढवला असतानाच, हर्षित राणाच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याने सीमारेषेवर एक अविश्वसनीय झेल पकडला. हाच झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. या झेळमुळे ओमानचा धावांचा वेग मंदावला. अखेर ओमानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0