Ashwini Bhide : आयएसएस अधिकारी अश्विनी भिडे सध्या मुंबईच्या मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे
मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या प्रधान सचिव पदी आयएसएस अश्विनी भिडे Ashwini Bhide यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांना “मेट्रो वुमन” म्हणून ओळखले जाते. आयएसएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्यावर सध्या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी शुक्रवारी एका विशेष आदेशांद्वारे त्यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्याचे आदेश काढले.व्ही. राधा यांनी यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे की, श्रीमती अश्विनी भिडे, शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती मुख्यमंत्री यांचेच प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई या पदावर ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्या जागी केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. तसेच पुढील आदेश होईपर्यंत आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभारही आपण धारण करावा.
कोण आहेत अश्विनी भिडे?
अश्विनी भिडे ह्या 1995 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे.
त्यांनी आतापर्यंत राज्यभर विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभागीय अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो-3 ची धुरा सोपवली होती. हा प्रकल्प कुलाबा – वांद्रे सिप्झ असा 33 किलोमीटरचा आहे. त्यात 26 स्टेशन अंडरग्राउंड बांधण्यात येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात मुंबई मेट्रोचे कामकाज अत्यंत वेगाने सुरू झाले. त्यामुळेच त्यांना ‘मेट्रो वुमन’ म्हणूनही ओळखले जाते
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…