Ashish Shelar Tweet : गणा धाव रे.. रायगडात पाव रे….. भाजपा आमदार आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका

आमदार आशिष शेलार यांची ठाकरे गटावर काव्यात्मक टीका
मुंबई :- भाजपचे नेते आमदार आशिष शेलार लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे संजय राऊत आणि संपूर्ण ठाकरे गटावर काव्यात्मक रुपी टीका करताना दिसत आहे. दररोज आपल्या सोशल हँडलवर एक काव्यात्मक टीका आशिष शेलार यांच्याकडून केली जात आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं सामना लागणार आहे. तर मुंबईत ठाकरे विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे त्यामुळे यंदाचे निवडणूक अतिशय रोमांचक होणार असल्याचे दिसून येत आहे. आरो प्रत्यारोपच्या फेरीत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष केले जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांना चांगलेच लक्ष करून गेल्या दहा वर्षाचा कामगिरीचा पाडा विरोधक आणि सत्ताधारी यांच्याकडून वाचला जात आहे. गणा धावरे… रायगडचा वडापाव रे… असे शब्द टाकत असेच शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना डीवचण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार आशिष शेलार यांचे ट्विट
नावा पुरता तरी कोकणात यांना ठेव रे !
गणा धाव रे.. रायगडात पाव रे सिंधुदुर्गाच्या वादळात सापडली याची नाव रे..उबाठा म्हणते आम्हाला..नावा पुरता तरी कोकणात ठेव रे …तुझ्या उंचीवर घातले निर्बंध
गेला सोडून यांना पक्ष सबंध
लालबागच्या राजाला रोखून दाखवले..
चिन्हासह यांनी सारे गमावले..! केला रामचा यांनी अपमान
गमावून बसले सारा मान….”त्यांची” मोदी तुफानात सापडली नाव रे…नावा पुरता तरी कोकणात ठेव रे !
गणा धाव रे …!