मुंबई

Ashish Shelar’s Poem : “यांच्या हास्य जत्रेपेक्षा केव्हाही आमचा प्रभाकर मोरे बरा” आशिष शेलार यांची संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कवितेतून टीका

•भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी कवितेतून पुन्हा एकदा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्यावर निशाणा साधला

मुंबई :- भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार गेले कित्येक दिवसांपासून ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांना कवितेच्या माध्यमातून सातत्याने टीका करताना दिसत आहे. सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाकडून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आणि त्यानंतर आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून संजय राऊत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. यांच्या हास्य जत्रा पेक्षा केव्हाही आमचा प्रभाकर मोरे बरा अशा शब्दात शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांची कवितेच्या माध्यमातून ट्विटवर टीका
…यांच्यापेक्षा बरा आमचा प्रभाकर मोरे!!

मध्यरात्र झाल्यानंतर
शहरातील दोन संजय एकमेकांना भेटले…!

विश्वविख्यात हातवारे करीत, केसांचा कोंबडा उडवीत,
मध्येच “मातोश्री”कडे पाठ
आणि “सिल्वर ओक”च्या दिशेने कटाक्ष टाकीत.. नजर शुन्यात टाकून “बाईट”चा हावभाव करु लागले…

दुसरे संजय, काँग्रेसच्या पराभवाची कारणे बसले होते वाचतं!
ते बसले होते ती खुर्ची पण होती त्यांना टोचत!!

तू रोज बोलतोस, म्हणून अख्खा
पक्षच गेला सोडून
मी एकदाच बोललो आणि पक्षाला दिला राजिनामा फाडून !

विश्वविख्यात म्हणाले…
मला कशाला तुझ्या सोबत ओढतोस ?
फुटक्या आघाडीला आणखी कशाला फोडतोस?

आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे आम्हीच..
काँग्रेस महाराष्ट्रात आमच्या समोर कमीच!

त्यावर रामभक्त संजय खवळले आणि म्हणाले..

उबाठा गटानेच काँग्रेसचे वाजवले तीनतेरा
तुम्ही म्हणजे जिथे जाल तिथे सैतानाचा फेरा!

निकाल तुम्हीच लावणार उरल्या सुरल्या काँग्रेसचा
इंतजाम करुन ठेवा, युवराजांच्या परदेशी तिकिटाचा

कशाला आघाडीचं नाटक करताय?
पायात पाय घालून एकमेकांना पाडताय?

माझ्या राजीनाम्यासाठी दबाव तुमचा ?
तुमच्या “खिचडीत” मीच फिरवतो आता चमचा !

जो ना रामाचा तो काय कामाचा?

एवढं ऐकल्यावर विश्वविख्यात चिडले..
“सामना” रंगतदार होणार म्हणून वेटर सगळे टेबला भोवती जमले!

गर्दी बघून दोघे ही सावरले
बोलती बंद अन् संवाद सगळे थांबले

दोघांचे ही क्षणात चेहरे कसे कोरे
यांच्या “हास्यजत्रे” पेक्षा केव्हाही
बरा आमचा प्रभाकर मोरे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0