Ashish Shelar Vs Ambadas Danve Tweet War : भाजपा नेते आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये ट्विटर वॉर
“यांना भ्रष्टाचाराचा भस्म्या झाला या!,”… अंबादास दानवे यांच्याकडून प्रत्युत्तर
मुंबई :- भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी काही दिवसांपासून ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांवर कविता च्या माध्यमातून ट्विट करून टीका करत आहे. आशिष शेलार यांच्या टीकेला आता ठाकरे गटाकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कविताच्या माध्यमातूनच ट्विट करत टीका केली आहे.
आशिष शेलार यांचे ट्विट
यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया !
डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया ?..”हाता”ला धरलंया म्हणिते गणित ठरलंया…यांना भरलंया न्यारं पिसं, …हे पाही ना रातंदिस..सोळा करुन गोळा बसं…कोण तुतारी घेऊन येतं…कोण मशाल पेटवून असं…मोदी-मोदी करीत बसलंया..”घमेंडिया” मध्ये फसलंया..हाता”ला धरलंया म्हणिते आमचं गणित ठरलंया?..मन नाही यांच स्थिर,..यांना राहिला ना धीर..जागांची किरकिर..हरण्याची घाई फार…मोदींच्या भीतीनं घेरलंया यांना भीतीनं घेरलयां…..हाताला धरलंया म्हणिते गणित ठरलंया !..डोकं फिरलंया, आघाडीचं डोकं फिरलंया ? ( लोककवी मधुकर घुसळे यांची क्षमा मागून)
अंबादास दानवे यांचे प्रत्युत्तर
यांना भ्रष्टाचाराचा भस्म्या झाला या!
भस्म्या झाला भाजपला भस्म्या झाला या,…खोटे बोलतीये, कचरा गोळा करती या.. हे पाही ना रात्रंदिस, ..मोदी-मोदी पूजत बसं.. सारे भ्रष्टाचारी घेऊन कसं.. वॉशिंग मशीनमधून काढी असं..
खोटी गॅरेंटी देत बसलया.. खोटे बोलतीये, कचरा गोळा करती या.. मणिपूर म्हणती आमचेच घरं..
तिथे जायला हिंमत नाही बरं..
महाराष्ट्रात विरोधात वारं फिरं..
हे हिमालयात जाणार बरं.. जनता उत्तर मागते या.. प्रचारक हकालती या.. ईडीचं बाहुलं केलं या.. म्हणी भाजपमध्ये या..