मुंबईठाणे
Trending

Ashish Shelar : महायुतीत ‘ठिणगी’! “सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील”; आशिष शेलारांचा अजित पवारांना खणखणीत इशारा

Ashish Shelar On Ajit Pawar : अमोल मिटकरींचे जशास तसे प्रत्युत्तर; “आम्ही शिव-शाहु-फुले-आंबेडकरी विचारांचेच राहणार!”

मुंबई | महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्षांमध्ये ‘मैत्रीपूर्ण’ लढतींऐवजी ‘शत्रुत्वाची’ भाषा सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या सत्तेवर अजित पवारांनी केलेल्या “राक्षसी भूक” या टीकेचा वचपा काढताना आशिष शेलार यांनी थेट विचारधारेवरून अजित पवार गटाला घेरले आहे. यावर राष्ट्रवादीनेही (अजित पवार गट) तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिल्याने युतीमधील दरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

आशिष शेलारांचा ‘सावरकर’ वार

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले की, “आमचे रवींद्र चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. अजित पवार यांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील.” शेलार यांनी महायुतीच्या भविष्यावर भाष्य करताना ‘एकला चलो रे’चा सूचक इशाराही दिला. ते म्हणाले, “तुम्ही याल तर तुमच्यासोबत, न याल तर तुमच्याशिवाय आणि विरोधात गेलात तर तुमच्या विरोधात आम्ही काम करू.”

मिटकरींचे ‘आंबेडकरी’ प्रत्युत्तर

शेलार यांच्या या इशाऱ्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले. “आम्ही शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरी चळवळीशी बांधील होतो आणि राहू. आम्हाला तुमची विचारधारा मान्य करण्याची सक्ती करू नका,” असे मिटकरी यांनी म्हटले आहे. उलट, “आमची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजाने का होईना स्वीकारावी लागते, हेच त्रिवार सत्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी शेलारांवर पलटवार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0