•Ashish Shelar On FM : भक्ती आणि भावनिक मराठी गाणी प्रसारित करण्यासाठी खास विनंती,मराठी भाषेचा प्रचार व सांस्कृतिक जपणुकीसाठी रेडिओ माध्यमाला बळ देण्याचा सरकारचा प्रयत्न
मुंबई :- सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी खासगी रेडिओ स्टेशन्सकडे एक विशेष अपील करत भावनिक आणि भक्तीपर मराठी गाणी नियमितपणे प्रसारित करण्याची विनंती केली आहे. त्यांनी या गाण्यांना श्रोत्यांच्या भावना आणि मराठी संस्कृतीशी नातं सांगणारं मानलं आहे.
21 मे 2025 रोजी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत शेलार यांनी खासगी रेडिओ चॅनेल्सच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी नमूद केलं की, “ग्रामोफोन आणि कॅसेटच्या काळातील गाणी आजही मराठी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ही गाणी केवळ मनोरंजनाचे साधन नसून, लोकांच्या भावविश्वाचा भाग आहेत.”
शेलार यांनी रेडिओ माध्यमाच्या सशक्तीकरणावर भर दिला आणि मराठी भाषा, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी रेडिओ हे प्रभावी माध्यम असल्याचं सांगितलं. त्यांनी नमूद केलं की, “आमच्या पिढीने ऑल इंडिया रेडिओवरून ही गाणी ऐकली, ज्या गाण्यांनी मनावर खोल परिणाम केला.”
प्रह्लाद शिंदेंच्या अमर भजनांचा उल्लेख
शेलार यांनी प्रह्लाद शिंदेंच्या भक्तीगायनाचं विशेष उल्लेख करत सांगितलं की, “आजही महाराष्ट्रातल्या गावखेड्यांपासून शहरांपर्यंत सत्यनारायण पूजेच्या वेळेस त्यांची भजनं वातावरण भारून टाकतात. ही गाणी परंपरेचा भाग झाली आहेत.”
या बैठकीत रेड एफएम, रेडिओ सिटी 91.1 इत्यादी खासगी चॅनेल्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठी गीतांचा प्रचार, रेडिओ माध्यमाला भेडसावणाऱ्या अडचणी, आणि सरकारी सहकार्याच्या शक्यतांवर सविस्तर चर्चा झाली.
राज्य सरकारने आश्वासन दिलं की, मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी रेडिओ स्टेशन्सच्या योगदानाचं कौतुक केलं जाईल आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य दिलं जाईल.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…