मुंबई

Ashish Shelar : काँग्रेसच्या जाहिरातीवरून भाजपाचे आमदार आशिष शेलार यांची टीका

•काँग्रेसच्या कैसे हात बदलेला हालात? या जाहिरातीवरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांची जोरदार टीका

मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ आले असून सध्या सर्व उमेदवार पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारात मग्न असताना काँग्रेसने आपल्या निवडणुकींच्या जाहिराती जाहीर केले आहे. या जाहिरातीमध्ये काँग्रेसने कैसे हात बदलेगा हालात अशी टॅगलाईन देत जाहिरात चालू केले आहे. या जाहिरातीतून मोदी आणि भाजपावर काँग्रेसकडून निशाणा साधण्यात आला आहे. आता त्या जाहिरातीवर भाजपाचे आमदार नेते आशिष शेलार यांच्याकडून टीका करण्यात आली असून या टिकामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचाही आशिष शेलार यांनी उल्लेख केला आहे. Ashish Shelar

आमदार आशिष शेलार यांचे ट्विट

एका पाठोपाठ भ्रष्टाचारी चालले जेलात…
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

बियर, व्हिस्की, वाईन पेग रिचवले..
आता यांचे पाय अडकले खोलात

रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

हिंदुहृदयसम्राटांनी ज्या हाताला फटकारले..
बाप-बेटे अडकले त्याच भ्रष्टाचारी “हाता”च्या गोलात

रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

पाणी, जमीन, कोळसा, आसमान खाल्ले..
देश केला उध्दवस्त भ्रष्टाचाराच्या या झोलात

रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी…
एकाच परिवाराचा “हात” लुटमारीच्या या मेल्यात

रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

पक्ष कोमात, फक्त जाहिरात मात्र जोमात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

60 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago