Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे वर निशाणा, जयंत पाटील यांच्या पराभवाचे खापर उद्धव ठाकरे वर
•छोटे पक्ष अजगराच्या विळखड्यात आहे असे खोचक ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.
मुंबई :- शुक्रवारी रात्री विधान परिषदेच्या 11 जागेचा कल जाहीर झाला. महाविकास आघाडीच्या नऊ जागांपैकी नऊ जागा विजय झाल्या तर महाविकास आघाडीच्या तीन पैकी दोन जागा विजय झाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गटाच्या पुरस्कृत शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हणाले की महाराष्ट्र पाहतोय, छोटे पक्ष अजगराच्या विळख्यात आहे असे खोचक ट्विट शेलार यांनी केले आहे.
भाजप आमदार आशिष शेलार यांचे ट्विट काय?
विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी ! सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !! असे म्हणत आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटला सुरुवात केली आहे. पुढे त्यांनी ठाकरे गटाला लक्ष केले आहे. “लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. गम्मत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती”, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
समाजवादी गणराज्य पक्षाचे नेते कपिल पाटील यांचा नाराजीचा सूर
कपिल पाटील यांनीही वक्त केली नाराजी दरम्यान, जयंत पाटील यांच्या पराभवावरुन समाजवादी गणराज्य पक्षाचे नेते कपिल पाटील यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. “इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केले. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच? असे ट्वीट त्यांनी केले आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
जयंत पाटलांच्या पराभवावर संजय राऊतांचेही भाष्य तर आज प्रसार माध्यमांशी बोलतांना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही जयंत पाटील यांच्या पराभवावर भाष्य केले आहे. ‘काँग्रेसचे 7 आमदार हे 2 वर्षांपासून काँग्रेस सोबत नव्हतेच. थोडे जर गणित जमले असते तर शेकापच्या जयंत पाटलांचा विजय झाला असता. शरद पवार यांच्या पक्षाचे सर्व 12 मतदान हे जयंत पाटील यांना पडले. त्यांच्यासाठी आम्ही मविआ म्हणून प्रयत्न केले”, असे संजय राऊत म्हणाले.