Asha Gawali On Arun Gawali : गँगस्टर अरुण गवळी तुरुंगातून बाहेर; कुटुंबासह चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मुंबई :- एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये ज्यांच्या नावाची दहशत होती, ते अरुण गवळी Arun Gawali तब्बल 17 वर्षांची शिक्षा भोगून अखेर घरी परतले आहेत. अरुण गवळी, ज्यांना ‘डॅडी’ या नावाने ओळखले जाते, त्यांच्या परतण्याने त्यांच्या पत्नी आशा गवळी आणि कुटुंबीयांना मोठा आनंद झाला आहे. आशा गवळी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
अरुण गवळींचे स्वागत करताना आशा गवळी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्या म्हणाल्या, “किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला… आज माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे, कारण माझे पती देव डॅडी 17 वर्षांच्या त्यागानंतर आज स्वगृही परतले.” हा क्षण केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिवार आणि चाहत्यांसाठी खूप खास असल्याचे त्यांनी सांगितले.
आशा गवळी यांनी पुढे म्हटले की, “इतकी वर्षे डॅडी आपल्या परिवारासोबत राहावे यासाठी संघर्ष करत होते. पण म्हणतात ना, ‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं’. त्यांनी जो संयम आणि सहनशीलता राखली आणि भगवंतावर विश्वास ठेवला, त्यामुळे आजचा हा आनंदाचा क्षण द्विगुणित झाला.”
अरुण गवळींनी भोगलेल्या दुःखाची कल्पना कोणीही करू शकत नाही, असे सांगत आशा गवळींनी त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली. या आनंदात सोबत असलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. सध्या आशा गवळी यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…