Rajesh Tope on Manoj Jarange : माणुसकी म्हणून अंतरवाली सराटी मध्ये पाणी चहा-पोहे वगैरे पुरवले;राजेश टोपे
Rajesh Tope on Manoj Jarange : अंतरवाली सराटी मध्ये उसळलेल्या जन आक्रोशाच्या आंदोलनात मी एक टक्का जरी दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईल, राजेश टोपे
मुंबई :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता गेल्या सहा महिन्यांपासून अंतरवाली सराटी मध्ये आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळी हिंसक वळण लागल्याने याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची आदेश दिले असून विधान परिषदेमध्ये एकीकडे फडणवीस आणि कोणी कुठे कशावरून चालवल्या होत्या याची माहिती आमच्याकडे आहे असे विधान केले असता दुसरीकडे विधान परिषदेचे प्रवीण दरेकर यांनी थेट शरद पवार आणि राजेश टोपे यांचे नाव घेतलं आहे. संगीता वानखेडे या महिलेने केलेल्या आरोपाच्या दावा केल्याचा प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केला. Rajesh Tope on Manoj Jarange
माजी मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना चर्चा करताना करताना म्हणाले की
आंतरवली सराटीमध्ये माणुसकी म्हणून पाणी, चहापोहे वगैरे पुरवले, असं राजेश टोपे म्हणाले. “जर माझ्या भागात एखादं आंदोलन होतंय, त्या ठिकाणी लाखो लोक जमा होणार असतील तर माणुसकी म्हणून कुणीही तिथे मदत करतो. तहानलेल्याला पाणी द्या, भुकेल्यासाठी पोहे वगैरे ठेवा अशा काही गोष्टी मी केल्या. मी कोणत्याही समाजाचे मोर्चे किंवा आंदोलनं झाली, तेव्हा त्यांच्यासाठी मी काम केलं आहे”, असं ते म्हणाले. Rajesh Tope on Manoj Jarange
आंतरवली सराटीमध्ये पहिल्यांदा लाठीचार्ज झाला, तेव्हा आपण तिथे गेलो होतो, असं टोपे म्हणाले. “लाठीचार्ज झाला तेव्हा मी तिथे गेलो. पण जखमींवर उपचार तातडीने व्हावेत हे पाहण्यासाठी गेलो होतो. तिथला लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथे गेलो होतो. त्याशिवाय माझा तिथे जाण्यामागे दुसरा कोणताही हेतू नव्हता. आता एसआयटीमधून सत्य समोर येईलच. खरंतर अशा प्रश्नावर एसआयटी नेमायला हवी का? हाही प्रश्न आहे”, असंही राजेश टोपेंनी नमूद केलं.
तर राजकारणातून संन्यास घेईन”
“जर यात मी भावना भडकवण्याच्या प्रयत्नात एक टक्काही दोषी असेन, तरी महाराष्ट्राच्या जनतेनं काहीही शिक्षा दिली तरी भोगायला तयार राहीन. राजकारणातून संन्यास घेईन. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमचीही मागणी आहे. त्याच भावनेनं आमचं आंदोलनाला समर्थन आहे”, असंही ते म्हणाले. Rajesh Tope on Manoj Jarange
“आंतरवली सराटीपासून पाच किलोमीटरवर कारखाना आहे. त्या छोट्या गावात कुणाला राहायला जागा नसेल तर लोक तिथे जाऊन थांबायचे. माध्यमाचे लोकही तिथे जाऊन थांबायचे. मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांचं हेलिकॉप्टरही कारखान्याच्याच हेलिपॅडवर उतरलं. मग असं म्हणायचं का की ते कारखान्याच्या हेलिपॅडवर उतरले म्हणजे त्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे?” असा सवाल राजेश टोपे यांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत उपस्थित केला आहे.