अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे तिन्ही नेत्याचा पराभव

•दिल्लीतील शकूब बस्ती विधानसभा मतदारसंघातून आपचे उमेदवार आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा पराभव झाला आहे.
ANI :- अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यानंतर दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचाही निवडणुकीत पराभव झाला. शकूर बस्ती मतदारसंघातून भाजपच्या करनैल सिंह यांनी सत्येंद्र जैन यांचा पराभव केला. केजरीवाल, सिसोदिया आणि जैन हे तिघेही तुरुंगात गेले आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे.तुरुंगात डांबलेल्या नेत्यांना दिल्लीच्या जनतेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे ‘आप’ची वाटचाल दारुण पराभवाकडे सुरू आहे. दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला. काँग्रेसचे संदीप दीक्षित तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
केवळ अरविंद केजरीवालच नाही तर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे जंगपुराचे उमेदवार मनीष सिसोदिया यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलासमध्ये मागे आहेत.