मुंबई

Arun Jagtap passes away : काँग्रेसचे माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

Arun Jagtap passes away : अरुण जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात महिनाभरापासून उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

पुणे :- आज,(2 मे) शुक्रवारी पहाटे काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार अरुण बलभीमराव जगताप यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. वयाच्या 67 वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अहिल्यानगर शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. Arun Jagtap passes away अरुण जगताप हे काका नावाने ओळखले जात. अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होत.त्यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली.

अरुण जगताप गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात महिनाभरापासून उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांचे पार्थिव सारसनगर भागातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल, नंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दुसरे चिरंजीव सचिन जगताप हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तर स्नुषा शितल संग्राम जगताप ह्या माजी नगरसेविका तसेच पत्नी व एक विवाहित कन्या असा परिवार त्यांच्यामागे आहे. भाजप आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व अहिल्यानगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे ते व्याही होत.

अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्दी

युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून अरुण जगताप यांनी राजकीय कारकिर्दिला सुरुवात केली. नगरसेवक, नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. काहीकाळ ते शिवसेनेतही गेले होते. नंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर ते सलग दोनवेळा विधानपरिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडूण गेले. तत्पूर्वी त्यांनी दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्रसेवा संस्थेचे अध्यक्ष यासह विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. घोडे पालनाचा व मोटारींचा त्यांना छंद होता. त्यांच्याकडे उत्तम पैदासीचे अनेक घोडे आहेत.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago