Arjit Singh Concert | पुणे पोलीस आयुक्तांचा दरारा : गायक अरजित सिंगचा कार्यक्रम, ‘ठिकाणा’ बदलला
पुणे, दि. ९ मार्च, महाराष्ट्र मिरर टीम : Arjit Singh Concert | Pune Police Commissioner’s statement: Singer Arjit Singh’s programme, ‘Thikana’ has changed
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वेळेचं बंधन न पाळणाऱ्या नाईट लाईफ व पब, बार यांच्यावर कडक कारवाईचे संकेत दिल्याने प्रख्यात गायक अरजित सिंगचा पुण्यात होणार कार्यक्रम पिंपरी चिंचवड हद्दीत हलविण्यात आला आहे. पुण्यातील नाईट लाईफसाठी प्रसिद्ध २ बीएचके क्लब कडून या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील राजा बहादूर मिल्स येथे ३ मार्च रोजी करण्यात आले होते परंतु पुणे पोलीस आयुक्तांचा दरारा पाहता हा कार्यक्रम स्थगित करून १७ मार्चला सुस येथे हलविण्यात आल्याची चर्चा आहे.
यापूर्वी देखील विश्व प्रसिद्ध गायक ए. आर. रहेमान याच्या कॉन्सर्ट दरम्यान पुणे पोलिसांनी १०. १५ वाजता कार्यक्रम बंद करून कडक शिस्तीचा हिसका दाखवला होता. आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या भीतीने अरजित सिंगचा कॉन्सर्ट वेळेचं बंधन, ध्वनी प्रदूषण, इत्यादी बाबींचा विचार करून पुणे शहराबाहेर हलविण्यात आल्याची चर्चा आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस हद्दीत देखील वेळेचं बंधन न पाळल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान कॉन्सर्टसाठी लागणाऱ्या विविध ना हरकती बाबत अद्याप ठामपणे माहिती मिळत नाही.