महाराष्ट्र
Trending

Beed News : मनोज जरांगेंना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; बीडमध्ये खळबळजनक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल!

Manoj Jarange Patil Vs Walmik Karad :“मी स्वतः गोळ्या घालतो”; वाल्मीक कराड समर्थक आणि जरांगे समर्थकामधील संभाषणाने खळबळ, गृहविभागासमोर मोठे आव्हान

बीड | आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये एका व्यक्तीने जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा दावा केला आहे. ही कथित क्लिप वाल्मीक कराड समर्थक आणि एका जरांगे समर्थकामधील असल्याचे सांगितले जात असून, यात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि एका जुन्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आल्याने जिल्ह्याचे राजकारण तापले आहे.

नेमकं काय आहे कथित ऑडिओ क्लिपमध्ये?

व्हायरल झालेल्या या कॉल रेकॉर्डिंगमध्ये दोन व्यक्तींमध्ये जोरदार वादावादी होत असल्याचे ऐकू येते. जरांगे समर्थकाने “पाटलांना काय करणार?” असे विचारल्यावर समोरून “मी स्वतः मनोज जरांगे यांना गोळ्या घालतो आणि त्यांना जीवे मारतो,” असे हिंसक उत्तर दिले जाते. इतकेच नाही तर, “पुन्हा धनंजय मुंडे किंवा वाल्मीक कराड यांचे नाव घ्यायचे नाही, नाहीतर तुलाही संपवून टाकीन,” अशी धमकी जरांगे समर्थकालाही देण्यात आली आहे. या संवादामुळे बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जुन्या वादाला फुटले तोंड मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंडे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक दावा जरांगे यांनी केला होता. त्यानंतर आता थेट गोळ्या झाडण्याची भाषा करणारी क्लिप समोर आल्याने या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. या क्लिपमध्ये उल्लेख असलेला वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असल्याने या धमकीला पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत आहे.

तपासाचे चक्र वेगाने; ‘ते’ दोन व्यक्ती कोण? ही ऑडिओ क्लिप वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बीड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतल्याचे समजते. ही क्लिप नेमकी कधीची आहे आणि त्यात बोलणाऱ्या व्यक्ती नक्की कोण आहेत, याचा तपास आता सायबर सेलच्या मदतीने केला जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील असतानाच अशा प्रकारच्या धमक्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0