MNS Leader Bala Nandgaonkar On Kabootar Khana : ‘लोकांना त्रास होत असताना जीवदया नको’; कबुतरखान्याबाबत मनसेने स्पष्ट केली भूमिका
मुंबई :- मुंबईतील कबुतरखाना बंदी प्रकरणाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. कबुतरखान्यांमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने मुंबई महापालिकेने ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पाठिंबा देत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar यांनी याबाबत परखड मत व्यक्त करत, “माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं?” असा सवाल केला आहे.
दादर येथील प्रसिद्ध कबुतरखान्याबाबत दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावर बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला आहे, आम्ही त्याच्या बाजूने आहोत.” त्यांनी जैन मुनींच्या काही वक्तव्यांवरही टीका केली. एका जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केल्याचा संदर्भ देत, ‘माणसं जगली तरच कबुतरांना खायला घालतील,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
नांदगावकर यांनी कबुतरांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर भर दिला. ते म्हणाले, “जर कबुतरांमुळे आमचा जीव धोक्यात येणार असेल, तर माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. जीवदया आणि भूतदया आम्हालाही करायची आहे, पण याचा अर्थ लोकांच्या आरोग्याची हेळसांड करणे नाही.”
आपल्या सोसायटीमध्ये जिम किंवा स्विमिंग पूल बांधताना एखादा लहान कबुतरखाना का बांधू नये, असा पर्यायही त्यांनी सुचवला, जेणेकरून कबुतरांची काळजीही घेतली जाईल आणि लोकांना त्रासही होणार नाही. या वादग्रस्त प्रकरणात 80 ते 90 टक्के जैन समाजही कबुतरखाना बंदीच्या बाजूने असल्याचे सांगत, नांदगावकर यांनी आरोग्याला आणि पर्यावरणाला प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. मनसेने घेतलेल्या या भूमिकेमुळे या वादाला आणखी एक नवीन राजकीय किनार मिळाली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…