पनवेल : कामोठे शहरांतील, दिवाळी निमित्त सेक्टर 34 येथे क्टिव सिटिझन काऊन्सिल व सेक्टर 34 येथिल सोसायटी यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या शहरातील सर्व स्वच्छता दूत, आरोग्य कर्मचारी, धूर फवारणी व ईतर सर्व कर्मचारी बांधव यांना दिवाळी भेट वस्तू तसेच दिवाळी फराळ , मिठाई वाटप करुन देश हिताचा, सर्वांच्या एकीचा,बांधिलकी जपण्याचा संदेश यातून दिला.
शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी, महानगरपालिका व लोकप्रतिनिधी म्हणून हे सर्वजण नेहमी तत्पर व सज्ज आहोत असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी उपक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यसम्राट मा.नगरसेवक विकास घरत, डॉ. सखाराम गारळे, युवा मोर्चा उपाध्यक्ष .राहुल बुधे, आदित्य भगत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना मगदूम कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र पाधी, विजय सरगर, सुशांत काटकर, भूषण यादव, चंद्रकांत यादव, चंद्रकांत खोसे व सर्व सोसायटींच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…