Anupam Kher : सिने अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी, पोलिसांनी दोन आरोपीला केले अटक
Anupam Kher on Mumbai office robbery : सिने अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात झालेल्या चोरीप्रकरणी आंबोली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही चोरटे असून त्यांनी शहरातील विविध भागात चोरी केल्याचे पोलिसांकडून खुलासा
मुंबई :- मुंबई शहरात अनेक दिग्गज आणि मोठे बॉलिवूड स्टार राहत आहे. सिनेस्टार साठी मुंबई ही मायानगरी म्हणून ओळखली जाते. अशातच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर Anupam Kher यांच्या कार्यालयात चोरीची घटना उघडकीस आली. त्यांचे मुंबईतील वीरा देसाई रोड येथील कार्यालयात ही चोरी झाल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे.चोरांनी त्याच्या मुंबईतील वीरा देसाई कार्यालयात प्रवेश केला आणि 4 लाख 15 हजारांची रोख रक्कम आणि चित्रपटाच्या वस्तूंनी भरलेली तिजोरी आणि बॅग चोरट्यांनी चोरली. याप्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्यात Mumbai Amboli Police Station गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनुपम खेर यांच्या कर्मचारी प्रवीण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन आरोपींना अटक
अंबोली पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मदतीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली आहे.रफीक माजिद शेख (35 वर्ष ) आणि मोहम्मद दलेर बहरीम खान (30 वर्ष ) या दोघांना पोलिसांनी 21 जून रोजी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल केला असून चोरी चोरलेले सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
अभिनेते अनुपम खेर यांचे (20 जुन) ट्विट
काल रात्री माझ्या वीरा देसाई रोडच्या ऑफिसमध्ये दोन चोरट्यांनी माझ्या ऑफिसचे दोन दरवाजे तोडून लेखा विभागातील संपूर्ण तिजोरी (जो कदाचित त्यांना तोडू शकला नसावा) आणि आमच्या कंपनीने बनवलेल्या चित्रपटाचे निगेटिव्ह जे एका बॉक्समध्ये होते ते चोरून नेले. आमच्या कार्यालयाने एफआयआर दाखल केला आहे आणि ते दोघेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बसलेले दिसले आहेत पोलिसांच्या येण्याआधीच लोकांनी हा व्हिडिओ दिला होता!
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-9, राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सुर्यकांत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबोली पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिभाऊ बिरादार, पोलीस उपनिरीक्षक पाटील, दा. नौ. नगर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार विलास दुलम, रमेश पाटील, गोरख पवार, प्रदिप कुलट,शिल्पेश कदम, पोलीस शिपाई शिवाजी कासार, सुनिल घुगे, निखिल बाबर, संदिप सांगळे, गणेश मेश्राम यांनी सिने अभिनेत्याच्या ऑफिस मध्ये चोरी करणारे आरोपींना अटक केली आहे.