Antop hill Police Latest News : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल, पोलीस शिपाई जखमी
मुंबई :- ॲन्टॉप हिल Antop Hill Area परिसरात कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलीस शिपायावर एका 27 वर्षीय तरुणाने सुऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. या हल्ल्यात पोलीस शिपायाच्या हाताला दुखापत झाली असून, आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. Mumbai Latest Crime News
या प्रकरणी, ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात Antop Hill Police Station कार्यरत असलेले पोलीस शिपाई समाधान माने (वय 37) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांना पोलीस ठाण्यातून हद्दपार केलेल्या आरोपींची त्यांच्या परिसरात उपस्थिती तपासण्याचे काम देण्यात आले होते. याच कामासाठी ते बंगालीपुरा परिसरात गस्त घालत असताना, त्यांच्यासमोर अचानक मोहम्मद पीर मोहम्मद पठाण नावाचा तरुण आला.
मोहम्मद पठाणने माने यांना त्यांच्या कामापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातात सुरा होता. माने यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ करत माने यांच्यावर सुऱ्याने हल्ला केला. त्याने माने यांच्या पोटात सुरा मारण्याचा प्रयत्न केला. माने यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सुरा त्यांच्या हाताला लागला आणि ते जखमी झाले.
हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक माने यांच्या मदतीसाठी धावले. मात्र, आरोपीने त्यांनाही सुऱ्याचा धाक दाखवून त्यांना मदत करण्यापासून रोखले. माने यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी त्यांना धक्का देऊन पळून गेला.
आरोपी मोहम्मद पीर मोहम्मद पठाण याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने यांना तात्काळ शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. ॲन्टॉप हिल पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…